माणूस माणसाजवळ जाण्यास घाबरायचा त्या काळात कोरोनाने जगात थैमान माजवलं होतं त्या वेळी किनारा वृद्धाश्रमाच्या शोध मोहिमे अंतर्गत कार्ला येथे एक बाबा जुना मुंबई पुणे महामार्गावर निराधार अवस्थेत आढळून आले. 2 दिवस आम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवले.अत्यंत वाईट अवस्थेत असलेल्या बाबांना वृद्धाश्रमात यायचे का विचारल्यावर लगेचच त्यांनी तयारी दाखवली.गेली 2 वर्षे हे बाबा किनारात रहात होते.स्मृतिभ्रंश असल्याने बाबांना पत्ता आठवत नव्हता..परंतु काही दिवसांपूर्वी अचानक त्यांना गावाचे नाव आठवले.आम्ही वर गुगल Search करुन गावाचे नाव शोधले. सदर बाबांचे नातेवाईक शोधण्यास M.P पोलीसांना विनंती केली व फोटो पाठवले.आश्चर्य म्हणजे दुसर्याच दिवशी पोलीसांनी नातेवाईकांशी बोलणे करुन दिले. व्हिडीओ कॉल वर नातेवाईकांनी बाबांना पाहून आनंदाश्रू वाहू लागले 2015 सालीच बाबा हरवले होते व नातेवाईकांनी Missing Complaint दिली होती. बाबा जिवंत सापडल्याने घरच्यांचा जीव भांड्यात पडला व आज सख्खा भाऊ व बाबांचा नातू आणि गावातील त्यांचा मित्र त्यांना 1000 कि मी वरुन इटारसी गावातून घ्यायला आले व काल दि.02/03/2023 रोजी बाबा त्यांच्या घराकडे रवाना झाले आहेत. M.P पोलीसांनी त्यांच्या हद्दीतील माणसाला आधार देऊन कोरोनाच्या काळातही सांभाळल्याबद्दल किनाराला खूप धन्यवाद दिले! बाबांना भेटण्यासाठी अख्खे इटारसी गाव खूप उत्सुक आहे. बाबांच्या कुटूंबियांनी व M.P पोलीसांनी त्यांच्या हद्दीतील माणसाला आधार देऊन 2 वर्षे सांभाळल्याबद्दल खूप धन्यवाद व्यक्त केले आहेत.
top of page
bottom of page
Comments